नमो गणपती नमो सरस्वती । नमो गा श्रीपती नंगेस्वामी ॥ १ ॥
नमो शिवहरा नमो विश्वंभरा । नमो दिगंबरा पांडुरंगा ॥ २ ॥
नमो तुज देवा गुरु आदीनाथा । विश्वाचा तूं ज्ञाता समर्थची ॥ ३ ॥
विश्वनाथ म्हणे सकळ सिध्दात । सखा भगंवत तूचि एक ॥ ४ ॥
श्री नाथ नंगे महाराज यांचे पूजापाठ, आरती व अभंग. प्रत्येक विभागाच्या खाली त्याचा PDF डाउनलोड करता येईल.
नमो गणपती नमो सरस्वती । नमो गा श्रीपती नंगेस्वामी ॥ १ ॥
नमो शिवहरा नमो विश्वंभरा । नमो दिगंबरा पांडुरंगा ॥ २ ॥
नमो तुज देवा गुरु आदीनाथा । विश्वाचा तूं ज्ञाता समर्थची ॥ ३ ॥
विश्वनाथ म्हणे सकळ सिध्दात । सखा भगंवत तूचि एक ॥ ४ ॥
आरती नंगे स्वामिची । परब्रह्म योगियाची ॥ धृ. ॥
सांवळी मूर्ति दिगंबर । अजानुबाहु योगी थोर । सगुण देही निर्विकार । हनुमंताच्या पारावर । दिव्य दृष्टी प्रकाशाची ॥ १ ॥ परब्रह्म.. आरती..
ब्रह्मा विष्णू शिव भोळा । आत्मरूपी तूं सांवळा । प्रकाश ज्योतिच्या वेगळा । पिंड ब्रह्मांडी घननिळा । दाविली माया विश्वाची ॥ २ ॥ परब्रह्म.. आरती..
विश्वामध्ये व्यापियेला । दत्त नामी प्रगटला । डहेगाव क्षेत्राला । काटेपूर्णा स्नानाला । वाहिनी उत्तर दिशेची ॥ ३ ॥ परब्रह्म.. आरती..
पंचप्राणाचे ताट हाती । लावूनी कर्पूराच्या ज्योती । सद्भाव आवाळू आरती । प्रेमे लोचन पाझरती । पाहुनि मूर्ति नाथाची ॥ ४ ॥ परब्रह्म.. आरती..
सगुण निर्गुण निराकार । मूळ माया ओंकार । भक्त तारण्या अवतार । निवारी संकटे अनिवार । आंस विश्वनाथा सेवेची ॥ ५ ॥ परब्रह्म.. आरती..
आरती सद्गुरु दत्ताची । करुया मूळ स्वरूपाची ॥ धृ. ॥
त्रिगुणाचा अवतार । देव दत्त विश्वेश्वर । सगुण तोचि निर्विकार । मूळ माया औंकार । नाथांचा नाथ । माया विरहित । दत्त समर्थ । निर्गुण निरंजन तोचि ॥ १ ॥ करुया.. आरती..
जपी तपी संत मुनी । केले तूच आत्मज्ञानी । तेच असती तुझ्या ध्यानी । सत्य बोध करिती जनी । जगा आधार भक्ति निर्धार । सत्कर्म सार । सांगड तुझिया नामाची ॥ २ ॥ करुया.. आरती..
दत्त ध्यानी नंगा योगी । साधियले लप जगी । संसारात भागी त्यागी । भक्ता ठेवी सदा जागी । दत्ताचे नाम । भक्ति निष्काम । नित्य तव काम । मागणी विश्वनाथाची ॥ ३ ॥ करुया.. आरती..
आरती चिन्मय सद्गुरुची, अबुज बाबा स्वामींची ।। धृ. ।।
विदेही मूर्ती ठेंगणीशी, पाहण्या दिसे गोजरीशी ।
कामना भक्तांची पुरवी, कल्पवृक्षची हा जेवी ।
धरा भावना, करा पूजना, अर्पा सुमना, करुनि ऐक्यता चित्ताची
ओवाळा आरती प्रेमाची ।। १ ।।
सदोदित जडुनि ध्यानात, व्यवहारी जनासंगे मात ।
पुसल्या दावी वेदांत, प्रेमे गात गुण गुणत ।
भक्तीची मूर्ति, अश्रुची भरती अखंडित नेत्री, समाधी निर्विकल्प ज्याची
सुध ना बुध कैची ।। २ ।।
सगुण साकार रूप धरुनि, पवित्र केली ही धरणी ।
लक्षणे स्थितप्रज्ञाची, गुणातीत असती त्यांची ।
करावा तोल, बोल नव्हे फोल, गोष्ट ही खोल ।
चालेना इथे तार्किकांची, गरज ही शुद्ध भावनेची ।। ३ ।।
आरती गाई प्रभुदास, नमूनि सद्गुरु चरणास ।
पूर्व पुण्य फळा आले, म्हणुनी दर्शन हे झाले ।
खरा हा बाप, जळाले पाप, पळाले ताप, खुंटली शक्ती वाणीची
मिती नाही तव गुणांची ।। ४ ।।
जय भगवान नंगे बाबा की जय ।
सब संतन की जय ।।
रचना : अमिता शेटे
ओवाळू आरती दयाळा, श्री विश्वनाथ स्वामी
तुझा श्री विश्वनाथ स्वामी
नागनाथ तू मच्छिंद्र सुत तव, जन्म अयोनि ॥ धृ. ॥
वाहे चरणी काटेपूर्णा, पुष्पोदक वाहिनी
दुमदुमतो घाट एकसारखा, दत्तनाम वचनी
पंचप्राण मम पाजळुनि हे, ठेऊनि निरंजनी
भक्तीने आरती राऊळी, आलो घेऊनि
मंदावती फुलवाती, भवभये, पळती बावरुनि
ज्योत वाढवी, प्रेमाची ती, धार वरी धरुनि ॥ १ ॥ श्रीपाळ
श्याम सावळे पण, तुझेच चिंतन, मूर्ती तव नयनी
विश्वनाथ तू, तूच माउली, दिनांची या भुवनी
सत्यरुप तव मजसी दावूनि, भवरोगा नाशुनि
जीवन फुलवी त्वरे पाव गा, कृपास्त धरुनि ॥ २ ॥
नाथ गोरक्ष विश्वनाथा, करितसे विनवणी
दिन लेकरु तुझे मी देवा, सत्वरी ये धावूनि
नाथांचा तू नाथ दयाळा, दे मज मूळ जाणूनि
भाव जडू दे मला एकची, ने मज तव चरणी ॥ ३ ॥
ओवाळू आरती दयाळा, श्री विश्वनाथ स्वामी,
तुझा श्री विश्वनाथ स्वामी
नागनाथ तू, मच्छिंद्र सुत, तव जन्म अयोनि ॥
जय देवी जयदेवी जय अंबाबाई ओवाळू आरती प्रेमे, तुज मायबाई ।।
पती पुत्रासह देवा दान दिले, संसारा अर्पिले नाथांपायी पती-पत्नी त्याग महान तो झाला, उपकार केला विश्वावरी तव हा त्याग वेदही गातील, पुराणे वर्णतील युगायुगी ॥१॥
जय देवी जयदेवी जय अंबाबाई ओवाळू आरती प्रेमे, तुज मायबाई ।।
विश्वजीवनासी सुगंधीत केले, जीवन जाळीले विश्वप्रेमे सितेचे मांगल्य, वसे तूज ठायी, प्रेम वात्सल्याची मुर्ती तू आई तुझिया त्यागाने विश्वा मिळे नाथ, म्हणूनि चरणी तुझीया डोई ॥२॥
जय देवी जयदेवी जय अंबाबाई ओवाळू आरती प्रेमे, तुज मायबाई ।।
आदिशक्ती खरी तुझिया रुपाने, म्हणोनिया जना नाथ दिला, किती वर्णं तुझे उपकार अंबे, विश्वा जगदंबे तारिलेसी । त्यागाचा महिमा वर्णवेना सार, नित्य तव ध्यान असो अंबाबाई ।।३।।
जय देवी जयदेवी जय अंबाबाई ओवाळू आरती प्रेमे, तुज मायबाई ।।
अंबाआई तू गे, जीवन अर्पिले, विश्वजीवन फुलविले डव्हाग्रामी । प्रणाम ने तुज माते कोटी कोटी, भक्तां उघडली ताटी उद्धाराची । नित्य प्रति बंदू मायबाई आता, दास ठेवी माथा चरणी आई ।।४।।
जय देवी जयदेवी जय अंबाबाई ओवाळू आरती प्रेमे, तुज मायबाई ।।
कर्पूर गौरं करुणावतारम् । संसारसारं भुजगेंद्र हारम् ।
सदा वसंतं हृदयारविन्दे । भवं भवानी सहितं नमामि ॥ १ ॥
मंदारमाला कुलिताल कायै । कपालमालांकित शेखराय ।
दिव्यांबरायैच दिगंबराय । नमः शिवायैच नमः शिवाय ॥
ॐ नमो शिवा नमो शिव भोळा । परब्रह्म योगी, नंगाची सांवळा ॥
नाथांचा तू नाथ, मच्छिंद्र अवतार । उध्दराया भक्ता, येई वारंवार ॥ १ ॥
निजभक्तांसाठी कष्ट तू भोगिसी । संकटे तयांची, तूचि निवारिसी ॥
दृढभाव ज्यांचा, घेसी तूं कैवार । उध्दराया भक्ता, येई वारंवार ॥ २ ॥
अनंत नामाचा, अनंत देहाचा । चराचुरी भरला, आत्मा तो रुपाचा ॥
शिवदत्तन मी, तूचि दिगंबर । उध्दस्या भक्ता येई वारंवार ॥ ३ ॥
तेजोमय तुझे, प्रकाशीत रूप । ज्योतिची हि ज्योत, हृदयी अरुप ॥
दृष्टिसी भरला, आंत तूं बाहेर । उध्दराया भक्ता येई वारंवार ॥ ४ ॥
ऐसा तूं योगी, नाथाचा हा नाथ । नवविधा भक्ति, ज्ञानासी समर्थ ॥
सगुण निर्गुण, तूच निर्विकार । उध्द्राया भक्ता, येई वारंवार ॥ ५ ॥
हनुमंता राऊळी निःसंग राहिले । जप तप तुझे, नाही ते कळले ॥
निमग्न सदा, ब्रह्मानंदी थोर । उध्दराया भक्ता येई वारंवार ॥ ६ ॥
मागितो मी भीक, तुजप्रति देवा । सद्बुद्धि देई घडो तुझी सेवा ॥
तुझिया नामाचा, नसावा विसर । उध्दराया भक्ता, येई वारंवार ॥ ७ ॥
नमितो मी देवा, तुज भगवंता । भाग्य हीन माझे, दुर करी चिंता ॥
आल्या या जन्माचा, करावा उध्दार । उध्दराया भक्तां, येई वारंवार ॥ ८ ॥
म्हणे विश्वनाथ, लीन वृत्ती व्हावे । भावभक्ति प्रेमे, ईश्वरा भजावे ॥
ठेवावे चित्त, गुरुचरणावर । उध्दराया भक्ता येई वारंवार ॥ ९ ॥
पुष्पान्जली मी तुम्हा अर्पितो, नाथा गुरुराया ।
भावभक्ति ज्ञान वैराग्य, फुले तुझी माया ॥ १ ॥
आत्मज्ञानाची ज्योत तुम्हा, सुगंध किती येतो ।
श्वासोच्छवास आंत बाहेर, निमग्नचि होतो ॥ २ ॥
इडा पिंगला मार्ग सुषुम्ना, दाटी वेलांची ।
काळा भुजंग मध्यभागी, फणी वर त्याची ॥ ३ ॥
बेलाफुलांचा वर्षाव होतो, तुम्हा समजेन्ना ।
सदानंद चिद्धन असे, निज आत्मघ्याना ॥ ४ ॥
विश्वनाथ म्हणे गुरुला, निद्रा कैसी आली ।
उठा लौकरी जागा पहा, निज वस्तु आपली ॥ ५ ॥
।। मंत्र पुष्पांजलि समर्पयामि ।।
घालीन लोटांगण, वंदिन चरण । डोळ्यांनी पाहिन रुप तुझे ॥
प्रेमे आलींगीन, आनंदे पूजिन । भावे ओवाळीन म्हणे नामा ॥ १ ॥
सद्गुरु देवा, शरण मी आलो । पिडूनिया गेलो, बहु दुःखे ॥ १ ॥
दीन रक्षकांचा, कैवारी असशी । धावोनिया येसी, रक्षी आम्हा ॥ २ ॥
तुजवाचोनिया, नसे आम्हा अन्य । काय घालू आण, तुझी देवा ॥ ३ ॥
जन्मासी येऊनी, पाप ते घडले । दुःख ओढवले धांव आता ॥ ४ ॥
करितो मी धावा, तुझिया नामाचा । आसरा कुणाचा, मज नसे ॥ ५ ॥
सुख आणि दुःख, समसुखे ठेवी । मनी अनुभवी, तूंच माझ्या ॥ ६ ॥
तेव्हा लागे गोडी, तुझिया नामाची । आवडी भक्तीची, जन्मोजन्मी ॥ ७ ॥
हेच सुख माझे, कर्मासी लाभले । भाग्य उदेले, जन्मांतरी ॥ ८ ॥
विश्वनाथ म्हणे, जन्म पराधिन । करावे पावन गुरुराया ॥ ९ ॥
सदा सर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ।
उपेक्षू नको गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेचि आता ॥ १ ॥
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥ २ ॥
।। भक्त वत्सल श्री नाथ नंगे भगवान की जय ।।
धाव धावरे धाव नाथा, येई लवकर ।
आम्हा दीनावर कृपा करावी, भक्ति सुख पार ॥ धृ. ॥
बहु जन्म दिवस गेले, आठवेना काही ।
मानव जन्मा आली आठवण, देवा तुझे पायी ।
बहु दुःखाने आम्ही पिडलो, कळेना आश्रय ।
निर्वाणीचा तूंच एक, आम्हा बाप-माय ॥ १ ॥ धाव धावरे..
करुनी - अकर्ता दयावंत, देवा तूंच राजा ।
तिन्ही लोकी गमन तुझे, येशी याच काजा ।
भक्तिभावे नाम मुखी, रंगी रंगु दे ।
सत्कर्माने सुख डोळा, चरण पाहु दे ॥ २ ॥ धाव धावरे..
आनंद ध्यानी आनंद मनी, आनंदी संसार ।
बुध्दि ज्ञान वैभव अंगी, तुझी कृपा थोर ।
अजन्माचा फेरा मिटण्या, छाया तुझी राया ।
सगुणरूपे भेट आम्हा, येऊ द्यावी दया ॥ ३ ॥ धाव धावरे..
मानव जन्मा पाप- पुण्य, तुझा अधिकार ।
गर्भवासी सुखी ठेवा, नाम निरंतर ।
संत - पायाची ओळख आम्हा, घडो सहवास ।
भक्तिमार्गे देह झिजवण्या, मना हिच आंस ॥ ४ ॥ धाव धावरे..
आत्मसुखाची दृष्टि दर्शविण्या, देवा तुझा भाव ।
सर्वाठायी एकरूप, सोहं तुझे नांव ।
जेथे तेथे तूच भरला, नामी विश्वंभर ।
पाहू जाता पाहू गेले, केले अमर ॥ ५ ॥ धाव धावरे..
विश्वनाथा ध्यान हृदयी, तुझा परिवार ।
नाथ दिगंबर नंगे स्वामी, दत्त अवतार ॥ ६ ॥ धाव धावरे धाव नाथा
येई लवकर आम्हा दीनावर कृपा करावी भक्ति सुख पार..
।। श्री नाथ नंगे भगवान की जय ।।
।। श्री विश्वनाथ भगवान की जय ।।
।। श्री दत्तात्रेय महाराज की जय ।।
।। बजरंग बली की जय ।।
गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरः ॥
शंखमध्ये स्थितं तोयं, भ्रामितं केशवोपरि ।
गुरु साक्षात, परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः ॥ १ ॥
अंगलग्नं मनुष्याणां, ब्रह्महत्या व्यपोहति ॥ २ ॥
आकाल मृत्यु हरणं, सर्व व्याधी विनाशनं ।
सद्गुरुपादोदकं तीर्थं, जठरे धारयाम्यहम् ॥ ३ ॥
पाहतां तुझे पाय, लंगडा मी झालो, ठाईच बैसलो, नाम घेता ॥ १ ॥
अहंभाव माझा देई अनुभव, सर्वाठाई देव एक भासे ॥ २ ॥
सांगावया नसे कळेना ते ज्ञान होई वृत्ति लीन समदृष्टी ॥ ३ ॥
नाम मुखी डोळा बोलण्यारसाळ । नसे अंगी खळ विश्वनाथा ॥ ४ ॥
रामकृष्ण हरी विठ्ठल माधव । गोविन्द केशव गोपाळचि ॥ १ ॥
अनंत नामांनी शोभला तूं हरी । उभा विटेवरी परब्रह्म ॥ २ ॥
बौध्दअवतारी वैकुंठ भुवरी । संतजना वारी नियमित ॥ ३ ॥
म्हणे विश्वनाथ अनंत रूपाचा । देव सकळांचा पंढरीत ॥ ४ ॥
घेईन मी वाचे नाम गोड मुखी । पायाची ओळखी ठेवतांना ॥ १ ॥
नसे माझ्या मनी दूजा भेदभाव । तूच माझा देव जन्मोजन्मी ॥ २ ॥
आठवण तुझी नामाने अंतरी । बोलते बाहेरी मुखी माझ्या ॥ ३ ॥
म्हणे विश्वनाथ नको काही आंस । आहो मी उदास तुझ्या नामे ॥ ४ ॥
जगाचा चालक नाथ तूं विश्वाचा । सकळ प्राण्यांचा पाठीराखा ॥ १ ॥
तुझे गुण गाता वेद झाले मौन । अठरा पुराण सांगावया ॥ २ ॥
तुझ्या सत्येविण चालेना कोणाचे । ब्रह्मांड मायेचे निर्मियेले ॥ ३ ॥
म्हणे विश्वनाथ करुनी अकर्ता । आहे तुझी सत्ता विश्वंभर ॥ ४ ॥
संसार करोनी, ईश्वरा भजावे । आवडीने घ्यावे नाम मुखी ॥ १ ॥
हरिनाम घेण्या, न लगे काळवेळ । पाहिजे प्रेमळ, भाव मनी ॥ २ ॥
सत्य भोळी भक्ति, आवडे देवाशी । लीन जो संतासी बहु प्रिय ॥ ३ ॥
विश्वनाथ म्हणे, नाम भक्तीसार करोनी संसार, साधा जन्मी ॥ ४ ॥
झाला भक्तीच्या आधीन । नाथ नंगा भगवान ॥ १ ॥
भक्तासाठी तळमळ । केला अवतारात मेळ ॥ २ ॥
देव भक्तांशी भेटले । मुक्त संसारासी केले ॥ ३ ॥
झाले जन्माचे सार्थक । विश्वनाथा ऐसे सुख ॥ ४ ॥