नाथ नंगे महाराज समाधी मंदिर
पवित्र समाधीस्थान आणि महाराजांच्या स्मृतींना समर्पित मंदिर.
डव्हा या पवित्र तीर्थक्षेत्रातील श्रद्धा, भक्ती, सेवा आणि अध्यात्माची माहिती एका ठिकाणी.
नाथ नंगे महाराजांच्या पावन समाधीस्थळामुळे डव्हा हे भाविकांसाठी श्रद्धेचे आणि अध्यात्मिक साधनेचे महत्त्वाचे स्थान आहे.
डव्हा, ता. मालेगाव, जि. वाशिम येथे नाथ नंगे महाराजांचे समाधी मंदिर आणि विविध धार्मिक स्थळांचा पवित्र परिसर आहे. विश्वनाथ बाबा समाधी मंदिर, दत्तात्रेय, गणेश, महादेव, हनुमान आणि इतर देवस्थानांमुळे मंदिर परिसराला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मंदिर दर्शन, धार्मिक कार्यक्रम, यात्रोत्सव, महाप्रसाद, भक्तनिवास आणि डव्हा येथे पोहोचण्याची माहिती या संकेतस्थळावर एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संपर्क साधामहाराजांच्या पवित्र समाधीस्थळाला भाविकांच्या श्रद्धेत विशेष स्थान आहे.
भक्तांच्या श्रद्धेनुसार नाथ नंगे महाराज हे आद्यनाथ मत्स्येंद्रनाथांच्या परंपरेशी संबंधित मानले जातात. त्यांच्या समाधीस्थळी भक्त दर्शन, पूजन आणि नामस्मरणासाठी येतात.
धार्मिक आख्यायिका आणि परंपरांबाबतची माहिती श्रद्धेच्या संदर्भात समजून घ्यावी.
मंदिर परिसरातील समाधीस्थान हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. येथे शांत, भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेता येतो.
नाथ परंपरेतील विश्वनाथ बाबांच्या स्मृतींना समर्पित पवित्र स्थान.
विश्वनाथ बाबा हे नाथ नंगे महाराजांचे परमशिष्य म्हणून भक्तपरंपरेत स्मरणात आहेत. मंदिर परिसरातील त्यांचे समाधी मंदिर, पादुका आणि उपलब्ध धार्मिक स्मृती भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहेत.
मंदिर परिसरातील प्रमुख धार्मिक स्थळांची माहिती.
पवित्र समाधीस्थान आणि महाराजांच्या स्मृतींना समर्पित मंदिर.
विश्वनाथ महाराजांच्या स्मृतींना समर्पित पवित्र स्थान.
दत्तात्रेय मंदिर आणि पादुकांचे पवित्र स्थान.
मंदिर परिसरातील श्री गणेशाचे पवित्र स्थान.
नंदीमंदिरासह महादेवाचे पवित्र स्थान.
परंपरेशी जोडलेले पवित्र हनुमान मंदिर.
मंदिर परिसरातील धार्मिक स्थळ.
संतपरंपरेच्या स्मृतींना समर्पित स्थान.
मंदिर परिसरातील श्रद्धास्थान.
संस्थानातील आगामी धार्मिक कार्यक्रम व उपक्रमांची माहिती.
लोड होत आहे…
रथसप्तमीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी मिरवणुकीचा भक्तिमय सोहळा आयोजित केला जातो.
यात्रोत्सवाच्या काळात भाविकांसाठी सामूहिक महाप्रसादाची व्यवस्था केली जाते.
भाविकांसाठी भक्तिभावाने आयोजित केला जाणारा सामूहिक प्रसाद.
यात्रेच्या काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी सेवा व्यवस्था.
अन्नदान, सेवा आणि भक्तीच्या माध्यमातून भाविकांचा सहभाग.
मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत.
भाविकांच्या निवासासाठी उपलब्ध व्यवस्था.
भाविकांसाठी उपलब्ध भोजन / न्याहरीची सुविधा.
धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी सभागृह.
कार्यक्रमांसाठी उपलब्ध सुविधा.
संस्थानाशी संबंधित आरोग्य सुविधा.
मंदिर परिसरापर्यंत वाहनाने पोहोचण्याची सुविधा.
डव्हा येथील मंदिर, संतपरंपरा, मंदिर वास्तू, धार्मिक स्थळे आणि वार्षिक यात्रोत्सवाची माहिती.
डव्हा या गावास विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते. नाथ संप्रदायातील आद्यनाथ मत्स्येंद्रनाथ तथा मच्छिंद्रनाथ यांचे अवतार मानले गेलेले नाथ नंगे महाराज यांचे मंदिर डव्हा येथे वसले आहे. ‘विश्व मंदिर’ अशीही ओळख असलेले हे मंदिर म्हणजे मालेगाव तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील असंख्य भाविकांकरिता पवित्र तीर्थस्थान आहे. येथे नाथ नंगे महाराजांचे परमशिष्य विश्वनाथ बाबा यांचेही समाधी मंदिर आहे. या विश्व मंदिरात रथसप्तमीस होणाऱ्या यात्रोत्सवास अलोट गर्दी उसळते. यावेळी येथे भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
नाथ नंगे महाराज हे नाथपंथातील योगी होते. भारतात आठव्या ते बाराव्या शतकाच्या काळात नाथ संप्रदायाचा उदय झाला. मत्स्येंद्रनाथ हे या संप्रदायातील पहिले पुरुष मानले जातात. मत्स्येंद्रनाथ यांची मच्छिंद्रनाथ, मच्छेंद्रपाद, मच्छघ्नपाद, मीनपाद आदी विविध नामरूपे विविध ग्रंथांत आढळतात. मत्स्येंद्रनाथ यांचे मूलस्थान अज्ञात आहे.
थोर संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या मते मत्स्येंद्रनाथ यांचा काळ इ.स. १०१५ पूर्वीचा आहे. त्यांच्या नावावर ‘कौलज्ञाननिर्णय’, ‘अकुलवीरतंत्रम्’, ‘कुलानंदतंत्रम्’, ‘ज्ञानकारिका’, तसेच ‘योगविषय’, ‘मत्स्येंद्रसंहिता’ असे ग्रंथ आहेत. यातील पहिले चार ग्रंथ हे कौलमताचे ग्रंथ आहेत.
नाथ नंगे महाराज हे मत्स्येंद्रनाथांचे अवतार गणले जातात. नाथ नंगे महाराजांचा पूर्वेतिहास अज्ञात आहे. ते अयोनिज असल्याची भक्तांची धारणा आहे.
त्यांच्याबाबत आख्यायिका अशी की साधारण १०० वर्षांपूर्वी डव्हा गावात मारुतीच्या पारावर दिगंबरावस्थेत बसलेली एक अनोळखी वृद्ध व्यक्ती गावकऱ्यांना दिसली. या भागात येण्याआधी मालेगाव तालुक्यातील जौळका या गावातील अवलिया संस्थान या ठिकाणी ते राहात असत. सडपातळ देह, दोन्ही डोळ्यांनी अंध, पायाने पांगळे, काळासावळा रंग असलेले हे ७५ वर्षीय गृहस्थ दिगंबरावस्थेत असल्याने गावकरी त्यांना सुरुवातीला ‘नंग्या’ या नावाने संबोधत. त्यांचा निवास सहसा मारुतीच्या पारावरच असे. तेथेच त्यांनी धुनी पेटवली होती.
भक्तपरंपरेनुसार त्या धुनीच्या राखेद्वारे रोग्यांचे व्याधी दूर करणे, चोरी गेलेल्या गायी वा वस्तू शोधून देणे, मुक्याला बोलायला लावणे, कुष्ठरोग बरा करणे असे काही चमत्कार त्यांनी करून दाखविले. यामुळे ते एक साक्षात्कारी पुरुष असल्याचे लोकांच्या लक्षात आले. हळूहळू त्यांचे भक्तगण वाढू लागले. विश्वनाथ महाराज हे त्यांचे पट्टशिष्य होते.
असे सांगण्यात येते की सुमारे १२ वर्षे नाथ नंगे महाराज यांनी विश्वनाथ महाराज यांना सर्व कसोट्यांवर आजमावून पाहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या अवतार समाप्तीची घोषणा केली व त्यानुसार समाधी घेतली. असेही सांगितले जाते की त्यांनी विश्वनाथ महाराज यांच्या देहामध्ये प्रवेश केला. रथसप्तमीच्या दिवशी हा परकाया प्रवेश झाल्यामुळे तेव्हापासून डव्हा येथे रथसप्तमीस भव्य जत्रा भरते. एकूण सात दिवस हा जत्रोत्सव सुरू असतो.
डव्हा गावामध्ये विस्तीर्ण प्रांगणामध्ये नाथ नंगे महाराज संस्थान वसलेले आहे. या प्रांगणात प्रवेश करताच सुरुवातीलाच डाव्या बाजूस विश्वनाथ बाबा समाधी मंदिर आहे. आधुनिक बांधकाम साहित्याचा वापर करून हे मंदिर बांधलेले आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. समोरच गर्भगृह आहे. त्यास सभामंडपातून प्रदक्षिणा मार्ग आहे.
सभामंडपातील खांबांवर आणि भिंतीवर अनेक जुनी छायाचित्रे लावण्यात आली आहेत. मंदिराच्या उभारणीपासून ते मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व अन्य महत्त्वाच्या व्यक्तींकडून दिल्या गेलेल्या भेटी, साजरे केलेले उत्सव यांचा त्यात समावेश आहे. सभामंडपात मागच्या बाजूला छोट्या देवळीमध्ये विश्वनाथ महाराज यांच्या मातोश्री मायाबाई यांचे छायाचित्र आहे.
गर्भगृहात उंच संगमरवरी चौथऱ्यावर चांदीच्या अधिष्ठानावर विश्वनाथ महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्तीच्या मस्तकी चांदीचा मुकुट आहे. मागे कोरीव नक्षीकाम केलेली चांदीची प्रभावळ आहे. मूर्तीसमोर महाराजांच्या चांदीच्या पादुका आहेत. या मागे भिंतीवर विश्वनाथ महाराजांचे छायाचित्र लावलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहावर वर निमुळते होत गेलेले गोलाकार शिखर आहे.
या मंदिरापासून काही अंतरावर नाथ नंगे महाराजांच्या समाधी मंदिराची मोठी वास्तू उभी आहे. विश्वमंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर जुने व दगडात बांधलेले आहे. मंदिरास छोटेखानी कमानदार प्रवेशद्वार आहे. येथून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात रुंदसर चौकोनाकार स्तंभ आहेत; ते मोठ्या कमानींनी एकमेकांस जोडलेले आहेत.
येथून पुढे चार-पाच पायऱ्या चढून वर गेल्यावर नाथ नंगे महाराजांच्या समाधीस्थानाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी हनुमानाची एका हातात द्रोणागिरी व एका हातात गदा घेतलेली उठावशिल्प प्रकारातील मूर्ती आहे. तिच्या दोन्ही बाजूंस चंद्र आणि सूर्य प्रतिमा रेखाटलेल्या आहेत.
समाधीस्थानाच्या प्रवेशद्वारास दुर्मिळ जुन्या पद्धतीचे लाकडी दरवाजे आहेत. येथून समाधीस्थानाच्या अंतराळात प्रवेश होतो. समोरच नाथ नंगे महाराजांच्या चांदीच्या पादुकांचे स्थान आहे. पुढे गाभाऱ्यामध्ये चांदीचे नक्षीकाम केलेल्या उंच अधिष्ठानावर नाथ नंगे महाराजांची काळ्या पाषाणात घडविलेली तेजस्वी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. त्यांच्या मस्तकी चांदीचा नक्षीदार मुकुट आणि वरच्या बाजूला चांदीचे छत्र आहे.
समाधी मंदिराच्या भोवताली प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गातील भिंतींमध्ये अनेक मोठे कोनाडे आहेत. येथील एका कोनाड्यामध्ये काळ्या पाषाणातील शनीची मूर्ती विराजमान आहे. या पुरातन मंदिराच्या मुखमंडपावर उंच शिखर आहे, तर गर्भगृहावर नागरी स्थापत्यशैलीतील शिखर आहे. या शिखराच्या आमलकाच्या खालच्या बाजूला अनेक नागमूर्ती आहेत. आमलकावर उंच कळस आहे.
नाथ नंगे महाराजांच्या समाधीमंदिरापासून वरच्या बाजूला जाण्यासाठी एक जिना आहे. येथे त्रिमुखी दत्तात्रेयाचे मंदिर आहे. येथे दत्ताच्या पादुकाही आहेत. या मंदिराच्या समोरच गणेशाचे मंदिर आहे. चारही बाजूंनी खुल्या असलेल्या या मंदिराचा कळस नागरशैलीतील आहे. हा भाग टेरससारखा खुला आहे.
येथील पायऱ्या चढून वरच्या भागात गेल्यानंतर नंदीमंदिर लागते. येथेच पुढच्या बाजूला महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात एका देवकोष्टकात महादेवांची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस पादुका आहेत. विश्वमंदिरालगत ब्रह्मदेव, तसेच संत नामदेव, कालिका माता यांचीही मंदिरे आहेत.
मंदिर आवारात एक यज्ञमंडप आहे. यात्रेच्या काळात येथे होमहवन केले जाते. या यज्ञमंडपालगत पुरातन हनुमानाचे मंदिर आहे. याच मंदिरात नाथ नंगे महाराज तपश्चर्या करीत असत. त्यांची गादी आणि त्यांचे एक छायाचित्र या मंदिरात ठेवण्यात आले आहे. मंदिरातील हनुमानाची मूर्ती ही दगडी व शेंदूरचर्चित आहे.
मंदिराच्या प्रशस्त आवारात संस्थानातर्फे चालविला जाणारा दवाखाना आहे. विश्वनाथ महाराजांनी लिहिलेल्या ‘विश्वजीवन’ या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी व इतर कार्यक्रमांच्या आयोजनासाठी येथे एक मोठे सभागृह बांधलेले आहे. यात्रा काळात तेथे पालखी ठेवली आहे.
संस्थानाच्या कार्यालयाजवळ एक ३० फूट उंचीचा पितळी ध्वजस्तंभ आहे. मंगल कार्यालयही याच भागात आहे. येथे भक्तनिवासाची सोय आहे.
या संस्थानात सात दिवसांचा वार्षिक यात्रोत्सव होतो. त्याची समाप्ती रथसप्तमीस होते. या काळात येथे गायत्री जप, अभिषेक-हवन, भागवत वाचन, हरिनाम सप्ताह आणि विश्वजीवन ग्रंथवाचन असे कार्यक्रम होतात.
रथसप्तमीच्या दिवशी नाथ नंगे महाराज आणि विश्वनाथ महाराज यांच्या मूर्तीला सूर्योदयाच्या समयी अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर आरती झाल्यावर दोन्ही महाराजांच्या पालख्यांची गावातून मिरवणूक काढली जाते. हजारो भाविक या मिरवणुकीत सहभागी होतात. यानंतर येथे महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम होतो.
संदर्भ पेजवरील वर्णनानुसार, महाप्रसादाच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक आणि वाहतूक व्यवस्था करावी लागते. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात आणि भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद तयार केला जातो.
वरील आकडे संदर्भ स्रोतावरील वर्णनानुसार आहेत; आगामी वर्षांसाठी अधिकृत आकडे संस्थानाकडून तपासावेत.
मंदिरात येण्यासाठी खालील प्राथमिक माहिती उपयोगी ठरेल.
डव्हा, ता. मालेगाव, जि. वाशिम, महाराष्ट्र
मालेगावपासून अंतर: सुमारे ११ किमी
वाशिमपासून अंतर: सुमारे २६ किमी
मालेगाव येथून एसटी / स्थानिक प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकते.
Google Maps वर मार्ग पहादर्शनाच्या अचूक वेळा, उत्सवाच्या आगामी तारखा आणि निवासाची उपलब्धता यासाठी मंदिर कार्यालयाशी संपर्क साधावा.
वेबसाइटवर उपलब्ध नसलेली अधिकृत माहिती स्वतःहून गृहीत धरू नये.
मंदिर, समाधीस्थळ आणि परिसरातील छायाचित्रे स्वतंत्र दालनात पाहा.
मंदिर परिसरातील उपलब्ध छायाचित्रे पाहण्यासाठी छायाचित्र दालन उघडा.
सर्व छायाचित्रे पहानामस्मरण, सदाचार, सेवा आणि मानवतेच्या भावनेतून अध्यात्मिक जीवन समृद्ध करण्याचा संदेश.
श्री नाथ नंगे महाराज संस्थान, डव्हा
ता. मालेगाव, जि. वाशिम, महाराष्ट्र
मोबाईल: ७०५७३१८५००
फोन करा