चाका तीर्थ
पवित्र आणि निसर्गरम्य तपोभूमी
चाका तीर्थ हे डव्हा गावापासून सुमारे २.५ किलोमीटर अंतरावर वसलेले शांत, पवित्र आणि निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. या परिसराला काटेपूर्णा नदीचा सुंदर वेढा लाभला असून, येथे नदी उत्तर दिशेकडे वाहते. त्यामुळे या स्थानाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
प.पू. श्री विश्वनाथ महाराजांनी येथे एका लहानशा कुटीत वास्तव्यास असताना श्री विश्वजीवन ग्रंथातील काही भागांचे लेखन केले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी श्रीनाथ नंगे महाराज संस्थान, डव्हा यांच्या वतीने येथे कायमस्वरूपी कुटी उभारण्यात आली आहे.
या परिसरात श्री विश्वनाथ महाराजांचे परमशिष्य श्री राजाबाबा आणि सुधादेवी यांच्या समाधी आहेत. तसेच श्री हनुमान मंदिर आणि श्री विश्वनाथ महाराजांच्या लाडक्या नंदीची समाधीदेखील येथे आहे.
हिरवाई आणि काटेपूर्णा नदीचा शांत प्रवाह यांमुळे हा परिसर अत्यंत प्रसन्न व मनोहारी दिसतो. येथे डव्हा संस्थानच्या वतीने गोसंरक्षण व गोसेवेचे कार्यही केले जाते.
दरवर्षी मुख्य रथसप्तमी यात्रेनिमित्त चाका तीर्थ येथे भव्य यात्रेचे आयोजन केले जाते.
छायाचित्रे




स्थान (नकाशा)
📍 चाका तीर्थ, डव्हा, महाराष्ट्र ४४४५०३